डॉक्टरांनो, खुशाल नक्षलवादी संघटनेत जा, आम्ही गोळय़ा घालू!

सामना प्रतिनिधी । नागपूर

मी रुग्णालयात येणार हे माहीत असूनदेखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारू, असे वादग्रस्त विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९३व्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयात सोमवारी अमृत दीनदयाळ मेडिकल स्टोअरचा शुभारंभ अहिर यांनी केला.

मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय मंत्री आहे. अशा शब्दांत त्यांनी उद्घाटन सोहळ्यानंतर डॉक्टरांना सुनावले.

  • mahendrapadalkar

    डॉक्टर लोकांनी त्यांच्या कडे आलेल्या जखमी नक्शलवादी तरूणांना पकडून दिले आहे अथवा त्यांना मार्गदर्शन करून हिंसाचार सोडायला तयार केले आहे असे आढळत नाही. त्यांचे मार्गदर्शक डाँ. सेन हे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. अहिर योग्य बोले.