फॅशन शो सुरू असताना रॅम्पवर पोहोचला भटका कुत्रा

74

सामना ऑनलाईन । मुंबई

फॅशन शो सुरू असताना एकापेक्षा एक सुंदर मॉडेल रॅम्पवर येत असतात. मात्र अचानक जर रॅम्पवर एखादा भटका कुत्रा आला तर काय होईल. असाच प्रकार प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल याच्या फॅशन शोच्या वेळी झाला. अचानक रॅम्पवर आलेल्या भटक्या कुत्र्याने सर्वांची धांदलच उडवली. या प्रकाराचा व्हिडीओ देखीस सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहित बाल यांच्या फॅशन शो च्यावेळी देशातील टॉप मॉडेल रॅम्पवर येत होत्या. एका खुल्या मैदानात हा फॅशन शो चा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ कपूर व अभिनेत्री डायना पेंटी हे शो स्टॉपर होते. सिद्धार्थ रॅम्पवर येणार इतक्यातच एक भटका कुत्रा धावत येऊन रॅम्पच्या मध्यभागी उभा राहिला. त्या कुत्र्यामुळे बराच वेळ तेथे गोंधळाचे वातावरण होते. मात्र नंतर त्या कुत्र्याला तेथून हाकलण्यात आलै व फॅशन शो पुन्हा सुरू करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या