शांततेचे नोबेल ट्रम्प यांना द्या

सामना प्रतिनिधी । टोकियो

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव नोबेल पारितोषिकासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी सुचवले आहे. तशी विनंती अमेरिकेच्या सरकारने त्यांना केली होती, असे वृत्त रविवारी एका स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे.

आपण उत्तर कोरियासोबतचे ताणतणाव कमी करून चर्चेचा मार्ग खुला केल्याबद्दल आपले नाव ‘नोबेल’साठी जपानच्या पंतप्रधानांनी सुचवले, अशी माहिती ट्रम्प यांनी शुक्रवारी दिली होती. आपले नाव सुचवताना शिंजो ऍबे यांनी पाच पानांचे अतिशय सुंदर ‘नॉमिनेशन लेटर’ लिहिले आहे, असे ट्रम्प यांनी ‘व्हाइट हाऊस’मधील एका पत्रकार परिषदेत सांगितले होते.