पाकिस्तानची आर्थिक मदत बंद करणार – डोनाल्ड ट्रम्प

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ट्वीट करत पाकिस्तानवर परखड शब्दात टिकास्त्र सोडले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘अमेरिकेने पाकिस्तानला मागील १५ वर्षात (२००२पासून) ३३ अब्ज डॉलरची (२१ खर्व रुपये) मदत केली आहे. अमेरिकेच्या मदतीच्या बदल्यात पाकिस्तानने आमच्या नेत्यांना मूर्ख समजून कपटीपणे फसवणूक केली. पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आसरा देणारा देश आहे असे म्हणत ट्रम्प म्हणाले की, आमचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत होते तेव्हा पाकिस्तानने त्यांच्या देशात त्याच दहशतवाद्यांना आश्रय दिला. त्यामुळे यापुढे अमेरिका पाकिस्तानला कोणतीही आर्थिक मदत करणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.