या श्वानांनो या रे या…!

1

 सामना ऑनलाईन । अमेरिका 

एखाद्या सरकारच्या कारभाराविरोधातील जनतेच्या मनातील असंतोष, चीड टोकाला पोहोचली तर राज्यकर्त्यांना किती निंदानालस्तीला तोंड द्यावे लागते याचा भयंकर अनुभव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या घेत आहेत. न्यूयॉर्कमध्ये रस्त्याच्या कडेला जागोजागी त्यांचे छोटे पुतळे ठेवण्यात आले आहेत. श्वानांनी त्यावर लघवी करावी यासाठीच ट्रम्प यांचे ते पुतळे असून त्यावर ‘पी ऑन मी’ असे स्पष्टपणे लिहिलेले आहे. हे पुतळे जाहिरात क्षेत्रातील एक दिग्गज फिल गॅबल यांनी बसवले आहेत. अशा प्रकारची नाचक्की वाटय़ाला आलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.