वाळू उपशावरील कारवाई विरोधात गाढव मोर्चा

donkey-1

सामना प्रतिनिधी। नेवासा

गाढवावरून वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना अधिकाऱ्यानी गाढवांना व त्यांची वाहतून करणाऱ्या मजुरांना तहसिल कार्यालयात बंद केले. यामुळे संतप्त झालेल्या वाळू उपसा करणाऱ्यांनी या घटनेचा निषेध करताना चक्क गाढवांचा मोर्चा काढला. एका राजकीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या आगळया वेगळया मोर्चाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

दरम्यान हा गाढव मोर्चा नेवासा तहसील कार्यालय येथे काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी निवासी नायब तहसिलदार ज्योतिप्रकाश जायकर यांची भेट घेतली व आपल्याला न्याय मिळवून देण्याची विनंती केली. त्यानंतर तहसिल कार्यालयातील त्या गाढवांना व मजुरांना सोडण्यात आले.