दुर्गम भागातील गावात गाढवं पोहचवतायत पाणी

77
donkey-1

सामना ऑनलाईन । नाशिक

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील दुष्काळग्रस्त आदिवासी गावात पाणी पोहचविण्यासाठी प्रशासनाने गाढवांना कामाला जुंपले आहे. कोईलिदाबार असे त्या गावाचे नाव असून हे गावा सातपुढा पर्वतरांगात अत्यंत दुर्गम भागात आहे. 250 लोकसंख्या असलेल्या या गावाला दररोज 17 गाढवे हजारो लिटर पाणी पोहचवत आहेत. पाणी पोहचविण्याच्या कामात गाढवांचा वापर करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.

कोईलिदाबार या गावात जाण्यासाठी अद्याप पक्क्या रस्त्यांची सोय झालेली नाही. त्यामुळे पाण्याचे टँकर तिथपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी दूरदूरपर्यंत पायपीट करावी लागत होती. आम्ही या गावात सर्वेक्षण केले तेव्हा या गावाजवळ असलेल्या चार ते पाच विहीरी पूर्णपणे आटल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी गावकऱ्यांना पाण्याची सोय करून देण्यासाठी गाढवांना कामाला लावले आहे.

जिल्हा प्रशासन अशा संकटाच्या काळात असंवेदनशील नाही होऊ शकत. पाण्याच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी आम्ही 17 गाढवं दररोज हजारो लिटर पाणी घेऊन कोईलिदाबार गावात पाठवत आहोत. पावसाळा येईपर्यंत अशा प्रकारे पाणी पोहचविण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या