विदेशी क्रिकेटपटू आवडत असतील तर देशातून चालता हो! विराटचे वादग्रस्त उत्तर

1

सामना ऑनलाईन, मुंबई

हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या एका विधानामुळे अडचणीत सापडला आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या अॅपवरून थेट विराट कोहलीला प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. एका क्रिकेटरसिकाने कोहली हा अवास्तव महत्व देण्यात आलेला क्रिकेटपटू असून मला त्याच्या फलंदाजीत काही विशेष वाटत नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मला जास्त आवडतात असं मत व्यक्त केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना विराट कोहली म्हणाला की जर तुला विदेशातील क्रिकेटपटू आवडत असतील तर तू हिंदुस्थानात राहतोयस तरी कशाला, तू देश सोडून जा.

विराटचे हे उत्तर अनेकांना पटलेले नसून त्याला टि्वटरवरून अनेकांनी खडे बोल सुनावले आहेत. “देशाच्या नागरिकाला हिंदुस्थानी सोडून जायला सांगणं हे काही बरोबर नाही विराट” असं एका ट्विटर वापरणाऱ्याने विराटला उत्तर दिलं आहे.

तर दुसऱ्या एकाने प्रश्न विचारलाय की “विराट हा राजकारण्यांसारखा का वागायला लागलाय?”


एका क्रिकेटरसिकाने विराट कोहलीचाच व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे ज्यात कोहलीने त्याचा आवडता खेळाडू हा हर्शेल गिब्स असल्याचं म्हटलंय