विद्यार्थ्यांनो गुगल-डुडल बनवा, 5 लाखाचं बक्षिस जिंका! राहिलेत फक्त 4 आठवडे

google-doodle-competition

सामना ऑनलाईन । मुंबई

दररोज गुगल सुरू केल्यावर पहिलं झळकतं ते डुडल. त्या-त्या दिवसाचं महत्व सागणाऱ्या डुडलमध्ये आपली संकल्पाना देखील असावी किंवा आपल्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती, विषय असावे असे अनेकांना वाटते. पण ते गुगल पर्यंत पोहचवता येत नाही. असं वाटत असेल तर गुगलने डुडल बनवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करून 5 लाख रुपये स्कॉलरशीप , 2 लाखाचे शाळेला टेक्नोलॉजी पॅकेज, गुगल ऑफिस व्हिजीट, गुगली स्वॅग, ट्रॉफी सर्टिफिकेट असं महाबक्षिस जिंकण्याची नामी संधी दिली आहे. मात्र ही स्पर्धा शालेय विद्यार्थी म्हणजे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी अवघे 4 आठवडे उरले आहेत. 6 ऑक्टोबर 2018 रात्री 10 पर्यंत तुमचा अर्ज पोहोचला पाहिजे. तेव्हा वेळ दवडू नका.

नवनवीन चरित्र, शास्त्रज्ञ, कलाकार, क्रीडा जगतातील घडामोडींवर आधारित माहिती देणारं डुडल हा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असतो. अनेकांच्या मनात डुडलच्या विविध संकल्पना असतात तेव्हा अशी डुडल बनवून ती गुगलकडे पाठवण्याची आणि बक्षिस जिंकण्याची संधी गुगलने दिली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनात्मकता ठासून भरलेली असते. तिला मोठं व्यासपीठ मिळाले तर त्यांची ही क्षमता आणखी फुलते. त्यामुळेच गुगल-डुडलची स्पर्धा ही शालेय विद्यार्थ्यांसाठी नामी संधी आहे. तेव्हा पालक आणि शिक्षकांनी ही संधी दवडू नये, म्हणूनच ही माहिती ‘सामना ऑनलाईन’ सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहचवत आहे.

गुगल-डुडलच्या स्पर्धेत कसे सहभागी व्हाल?

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालक किंवा शिक्षकांना पुढाकार घेऊन आपल्या पाल्याची/विद्यार्थ्याची माहिती आणि त्यांचे ‘डुडल-चित्र’ (आर्ट वर्क) गुगलचा फॉर्म भरून किंवा इमेल करून पाठवावी लागणार आहे. त्यासाठी पुढील प्रमाणे कृती करा.

1. गुगल या सर्च इंजिनवर जा. (https://www.google.com/)

2. सर्च बार खाली ‘Calling all young artists: 4 weeks left to submit your artwork for Doodle 4 Google’ अशी आहे. तिथे ‘submit your artwork‘ येथे क्लिक करा.

submit-doodle-art-work

3. तुमच्या समोर नवीन पेज झळकेल. ज्यावर ‘What inspires me?’ असा मथळा दिसेल. त्यामध्ये स्पर्धेच्या संकल्पनेविषयी माहितीदिली आहे. तसेच काही उदाहरणं देखील दाखवली आहेत. त्यानंतर ‘ENTER A DOODLE‘ वर क्लिक करा.

doole-entry

4. तेव्हा तुमच्यासोमर नवीन पेज झळकेल, इथे तुम्हाला स्पर्धेचा अर्ज (फॉर्म) भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतील. फॉर्म ऑनलाईन भरता येईल किंवा तुम्ही फॉर्म डाऊनलोड करून मग पोस्टाने देखील पाठवू शकतात.

doodle-form

4 (a). ऑनलाईन फॉर्म भरणं अगदी सहज आणि सोपं आहे. फार्म भरताना तुम्ही पालक आहात की शिक्षक त्यावर क्लिक करा. स्पर्धक विद्यार्थ्याचे नाव आणि जो (शिक्षक किंवा पालक) फॉर्म भरत आहे त्याचा ई-मेल आयडी लिहा. त्यानंतर आपल्या विद्यार्थ्याच्या शाळेचा संपूर्ण पत्ता, विद्यार्थ्याचा ग्रूप निवडा. त्याने काढलेल्या डुडल चित्राचा फोटो, स्कॅन अपलोड करा. पण ते JPG किंवा PNG. फॉरमॅटमध्येच हवे आहे. आणि Please show us you’re not a computer: या बॉक्समध्ये क्लिक करा. विचारलेले चित्र सिलेक्ट करून व्हेरिफाय करा. सबमिट करा.

4(b). अर्ज पोस्टानं पाठवायाचा असेल तर फॉर्म डाऊनलोड करा. त्यानंतर रिकाम्या रकान्यांमध्ये माहिती व्यवस्थित माहिती भरून पुढील पत्त्यावर पोस्ट करा.

Doodle for Google 2018,
Google India Private Limited,
Signature Tower 2, Tower B,
Delhi – Jaipur Expressway,
Sector 15 – Part 2, Gurugram,
Haryana, 122001.

doodle-pdf-form