महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला जनसागर

सामना प्रतिनिधी। मुंबई 

हिंदुस्थानच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी  चैत्यभूमीवर मोठा जनसागर उसळला होता. देशाच्या कानाकोपऱयातून आपल्या कुटुंबकबिल्यासह आलेल्या भीमअनुयायांनी मोठय़ा शिस्तीने महामानवासमोर माथा टेकून अभिवादन केले.

चैत्यभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकांचे स्टॉल लागले होते. तेथेही पुस्तकांच्या खरेदीसाठी अनुयायांची मोठी गर्दी होती. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हजारो अनुयायांची पावले इंदू मिलच्या दिशेनेही वळली होती.