महामानवाला निळा सलाम!

देशाच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी असते. हा दिवस आंबेडकर जयंती किंवा भिम जयंती किंवा समता दिन किंवा ज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांच्या जन्मदिवशी प्रत्येक वर्षी त्यांचे लक्षावधी अनुयायी त्यांचे जन्मस्थळ महू (मध्य प्रदेश), दीक्षास्थळ दीक्षाभूमी (नागपूर), समाधी स्थळ चैत्यभूमी (दादर, मुंबई), सार्वजनिक ठिकाणे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील ६५ पेक्षा अधिक देशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी केली जाते.