‘तें’च्या नाटकांतील स्वगते

सामना ऑनलाईन । मुंबई

डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाचा म्युझियम कट्टा आणि पॉप्युलर प्रकाशन यांच्यावतीने ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘तें’च्या नाटकांतील स्वगते सादर केली जाणार आहेत. आविष्कारचे कलावंत हा कार्यक्रम सादर करतील. यावेळी तेंडुलकरांच्या निवडक प्रवेशाचे अभिवाचन होईल. सुनील जोशी, मानसी कुलकर्णी, चिन्मयी सुमित, सुशील इनामदार, दीपिका राजाध्यक्ष नाटकांतील स्वगतं म्हणतील. हा कार्यक्रम शैक्षणिक केंद्र, डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, भायखळा येथे २१ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.