।।तुळसी विवाह।।

>>डॉ. दीपक केसरकर, आयुर्वेदतज्ञ

आता काही दिवसांतच आपल्या चिमुकल्या तुळशीचे लग्न लागेल. सावळ्या कृष्णाची सावळी तुळस… त्याची प्राणप्रिया… या विवाहसोहळ्यातील सारीच मंडळी आपल्याला आरोग्यदान भरभरून देणारी…

पुराणात एक कथा प्रसिद्ध आहे. जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी कृंदा ही पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्य पुण्यामुळे विष्णूला जालंधरला मारणे अवघड होऊन बसले. तेंव्हा श्री विष्णूने जालंधराचे रूप घेऊन कृंदेच्या पतिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला. हे कृत्त कृंदेला समजताच तिने विष्णूला शाप देऊन ती स्कतः सती गेली. तिच्या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगकली , तीच तुळस. म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते.

ऊस
गुळ साखर काकवी असा सगळ्या गोष्टींनी परीपूर्ण असा ऊस. काविळीत रामबाण उपाय म्हणून ऊसाचा रस पितात. जेवणात साखरे ऐवजी गुळ वापरल्यास बहुतेक आजार नियंत्रणात येऊ शकतात. असे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे. गुळात नैसर्गिकता जास्त असल्याने शरीराला हळहळू आणि दीर्घकाळापर्यंत ऊर्जा देतो. गुळाने थकवा जाणवत नाही व स्नायू बळकट बनवतात. गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने रक्ताचे प्रमाण वाढते. गूळ आणि आले एकत्र खाल्ल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो. रात्री झोपण्याआधी दोन चिमूटभर सुंठ, गूळ एकत्र करुन चाटण केल्यास खोकला लागत नाही. मासिक पाळीच्या वेळी गूळ खाल्ल्याने पोटदुखी, स्नायू दुखणे, अस्वस्थ वाटणे या सगळ्या गोष्टीत आराम मिळतो. काकवी योग्य प्रमाणात खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. गर्भाशयाची शुद्धी होते. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर निघून जातात.

तुळस
तुळशीचे रोपटे ज्यांच्या दारी ।। लक्ष्मी नांदे त्याच्या घरी ।।
अशी पूर्वापार चालत आलेली ओवी आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा, संपत्ती हा अर्थ नसून आरोग्य हा गर्भार्थ आहे आणि साहजिकच ज्या ठिकाणी आरोग्य आहे त्याठिकाणी पैश्यांची बचत होऊन संपत्तीत वाढ ही होणारच. हिंदु धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळस ही जास्तीत जास्त काळ ऑक्सिजन बाहेर सोडणारी वनस्पती म्हणून ओळखली जाते. तुळशीची माळ ही पावित्र्य म्हणून गळ्यात घालतात खरं. पण ही तुळस प्रभावाने हृदय, फुफ्फुस, श्वासनलिका यांच्या ठिकाणी होणारा जंतुसंसर्ग थांबवते. तुळस रसाच्या स्वरुपात प्यायल्याने रक्तातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करते. यकृताचे काम सुधारत थंडी येणाऱया तापात तुळशीच्या पानांचा काढा देतात त्याने तापात आराम मिळतो. दारातील तुळशीच्या रोपामुळे हिवतापाचे डास आसपास येत नाहीत. तुळशीचा रस घाम येण्यासाठी उपयुक्त आहे, म्हणून त्वचाविकारात या रसाचा उपयोग होतो. तुळशीचे पान व काळीमिरी एकत्र करून त्याचा लेप लावल्यास गजकर्ण लवकर बरे होते. तुळशीचे रोप हे शरीरातील उष्णता कमी करण्याचे महत्वाचे काम करते. लघवीला जळजळ, वेदना होत असेल, लघवीच्या ठिकाणी सूज आली असेल तर तुळशीच्या बियांनी ते कमी होते. कान दुखत असल्यास चार थेंब तुळशीच्या पानांचां रस टाकल्यास कानदुखी थांबते. तुळशीचे पान चघळल्याने तोंडाची दुर्गंधी जाते.

आवळा
यात दोन प्रकार असतात. डोंगरी आवळा हा चवीला तुरट असतो, तर गावठी आवळा चवीला आंबट असतो. गावठी आवळा खाल्ल्याने भूक वाढते. जिभेला चव येते. पचनक्रियेस मदत मिळते. डोंगरी आवळा हा तुरट रसाचा असून तो आयुर्वेद शास्त्रात बहुतांशी औषधामध्ये वापरला जातो. आवळ्यापासून तयार केलेले तेल केसांचे गळणे थांबवते आणि वाढ करण्यास मदत करते. तोच गोड पाकातला मोरावळा आम्लपित्त दूर करण्यास मदत करतो. मीठ लावून सुकवलेला आवळा प्रवासात उलटीची भावना कमी करते. आवळ्याच्या पावडरची राख पाण्यासोबत घेतल्यास गरोदरपणातल्या उलट्या कमी होतात. हाच आवळा हळदीसोबत काढा करवून घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत मिळते.

चिंच
चिंच हे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. मनाला आणि शरीराला तृप्ती देणारा असा पदार्थ म्हणजे चिंच, चिंचेची चटणी ही तोंडाची अरुची दूर करते. भूक वाढवते. खाद्यपदार्थाला वेगळी चव आणते. पिकलेल्या चिंचेचे पन्हे पित्तज रोगात उपयोगी पडते, हृदयाचे बळ वाढवते. उत्साह वाढवते. याच्या पानांचा लेप सूज कमी करतो. टरफलांची राख पोटदुखी कमी करते.

बोरं
वारंवार उचकी येत असल्यास बोराची पावडर पाण्यासोबत घ्यावी, बोराच्या पानांचा लेप गळू आलेल्या ठिकाणी लावल्यास गळू पिकतो. बोरांच्या पानाचा रस ओटीपोटावर लावल्यास कष्टार्तन पीसीओडी या आजारात त्रास कमी होण्यास मदत मिळते.