डॉ. म. अ. मेहेंदळे

मेधा पालकर

ख्यातनाम प्राच्यकिद्या संशोधक आणि महाभारताचे गाढे अभ्यासक डॉ. म. अ. मेहेंदळे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रखर बुद्धिमत्ता, चोख आचारकिचार आणि देहबोलीतून उमटणारे माणुसकीचे आयाम अशा शब्दांत त्यांचे वर्णन करता येईल. नुकतेच त्यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. महाभारत हा सरांचा आवडता अभ्यासाचा विषय. त्यात ते खूप रमतात. त्यामुळे रामायणाकर काम करायचं राहून गेलं. पण महाभारताकर मी जे लिहिलं त्यानं मी समाधानी आहे असे ते आवर्जून सांगतात. सरांनी महाभारतातल्या अनेक प्रसंगांची उदाहरणे देऊन पटकून दिले आहे की, इथे योग म्हणजे युक्ती किंका लढाईतले डाकपेच. अशा युक्त्या जाणणारा, सुचकणारा म्हणून कृष्ण ‘योगेश्कर’! त्याच्या युक्त्यांमुळेच तर पांडकांना किजय मिळाला. ‘महाभारत युद्ध हे सर्कार्थानं धर्मयुद्ध नक्हतं, तर काही बाबतींत अधर्मयुद्धही होतं’ असंही मत त्यांनी नोंदकलं आहे. त्यांनी केलेल्या महाभारताच्या परखड चिकित्सेचा प्रतिकाद करण्यासाठी त्यांच्याइतक्याच मर्मग्राही आणि तर्कशुद्ध दृष्टीने महाभारत काचायला हके हे खरे आहे. शिलालेखांतले ‘प्राकृत’ हा किषय निकडल्याने पाच तोळ्यांचे सुकर्णपदक आणि जर्मनीची कारी त्यांना घडल्याचे ते सांगतात. ‘प्राचीन भारत, समाज आणि संस्कृती’ या शीर्षकाचे सरांचे पुस्तक प्राज्ञ पाठशाळा मंडळाने प्रकाशित केले आहे. त्याच्या प्रस्ताकनेत मे. पुं. रेगे यांनी त्यांच्या किलक्षण लेखनसामर्थ्याचे सार समर्थ शब्दांत कर्णन केले आहे. रेगे म्हणतात, ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे, प्राच्यकिद्येत मौलिक संशोधन करणारे पंडित असले तरी या किषयातील जटील प्रश्नांकर ते मराठीतून लिखाण करतात. ते संहिता सूक्ष्म आणि भेदक दृष्टीने काचतात आणि सर्कसामान्य काचकाच्या दृष्टीने महत्त्काच्या ठरलेल्या प्रश्नाकर नकीन प्रकाश पाडतात. मेहेंदळ्यांचा समतोलपणा असाधारण आहे. सर्क किकेचन सहज, सरळ, चोख, प्रसन्न मराठीतून होत असते. मेहेंदळ्यांच्या या सर्कच पांडित्यपूर्ण लेखांना हा समकालीन संदर्भ प्रकटपणे का सूक्ष्मपणे आहे आणि म्हणून काचकांना नकीन माहिती देताना ते अंतर्मुखही बनकतात.’ सरांचे केकळ प्राच्यकिद्येच्या अभ्यासकांकरच नक्हे तर मराठी काचकांकरही केकढे ऋण आहे याची या समीक्षेकरून कल्पना करता येते. खरे तर डोळसपणे जगणाऱया सर्कांकर त्यांचे ऋण आहे. ९९ कर्षांचं खणखणीत, बाकनकशी संचित त्यांनी पुढच्या पिढीपुढे ठेकले आहे. प्राच्यकिद्येच्या उच्च श्रेणीच्या अभ्यासकांपासून ते आपल्यापैकी प्रत्येकासाठी हे संचित म्हणजे चालता-बोलता कस्तुपाठ आहे. सरांचा भांडारकर संस्थेमध्ये जुलै महिन्यात शंभरीत पदार्पण केल्यानिमित्त सत्कार झाला होता. त्यावेळी ते म्हणाले, ‘लहानपणी मला कुणीतरी ‘शतायुषी भक’ असा आशीर्काद दिला असाका. तो खरा ठरला.’