डॉ. मनोहर जोशी यांच्या ‘अवघे पाऊणशे वयमान’ या पुस्तकाचे प्रकाशन

58

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना नेते डॉ.मनोहर जोशी यांच्या ‘अवघे पाऊणशे वयमान’ या पुस्तकाचे रविवारी गुढीपाडव्यादिवशी प्रकाशन करण्यात आले आहे. या प्रकाशन सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी उपस्थित होते.

दादर येथील शिवाजी मंदिर येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला असून नवचैतन्य प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. डॉ. जोशी यांचे हे तेरावे पुस्तक असून या पुस्तकात राजकीय नेते तसेच कलाकार यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. शरद पवार, प्रतिभा पाटील, पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील, रमेश देव, बाबासाहेब पुरंदरे, सुधीर जोशी, उषा मंगेशकर, नीलकंठ खाडिलकर, मधु मंगेश कर्णिक, ह.भ.प बाबामहाराज सातारकर, डॉ. मधुकर मेहेंदळे, डॉ. विजय ढवळे, डॉ. शरद बापट, डॉ. रमेश जोशी, डॉ. जगदीश वाघ, सुमन व्यास आणि अशोक चिटणीस यांच्या मुलाखतींचा पुस्तकात समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या