डॉ. तात्याराव लहाने यांना पितृशोक

46

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने तसेच डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे वडील पुंडलिकराव लहाने यांचे रविवारी वृध्दापकाळाने निधन झाले. लातूर येथील खासगी रुग्णालयात त्यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. सोमवारी सकाळी 10 वाजता लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातल्या माकेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या