शिवाजी मंदिरात रंगणार क्लासिक नाटकांचा महोत्सव

सामना ऑनलाईन । मुंबई

‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या चिंतन मंचाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी मंदिरात तीन दिवसांचा क्लासिक नाटकांचा महोत्सव रंगणार आहे. या रंगतदार महोत्सवात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘गर्भ’, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘अनहद नाद – अनहर्ड साऊण्ड ऑफ युनिव्हर्स’ आणि १७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता ‘न्याय के भंवर में भंवरी’ ही तीन अभिजात नाटके पाहायला मिळतील. या तीनही नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि रंगचिंतक मंजुल भारद्वाज हे असून त्यांनीच ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या चिंतन मंचाची स्थापना १२ ऑगस्ट १९९२ रोजी केली. या तीन नाटकांमध्ये योगिनी चौक, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के वगैरे कलाकार चमकणार आहेत. भंकरी या एकपात्री प्रयोगाची धुरा सुप्रसिद्ध अभिनेत्री बबली राकत या सांभाळणार आहेत.