पुजाराच द्रविडचा खरा वारसदार, विक्रमही बोलतात ‘हम साथ साथ है’

56

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अडलेडमध्ये गुरुवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय टीम इंडियाच्या अंगलट आला. टीम इंडियाला सुरुवातीलाच एकामागोमाग एक चार धक्के बसले आणि पन्नाशीपर्यंत पोहोचेपर्यंत चार खंदे फलंदाज बाद झाले. परंतु पुजाराने पुन्हा एकदा टीम इंडियाचा डाव सावरला आणि आपणच द्रविडचे खरे वारसदार आहेत हे दाखवून दिले. विक्रमही याचे साक्षिदार असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.

पुजाराने दिवसाच्या अखेरच्या षटकांमध्ये धावबाद होण्यापूर्वी 246 चेंडूचा सामना करताना 123 धावांची झुंजार खेळी केली. पुजाराचे ऑस्ट्रेलियामधील हे पहिलेच शतक असून अडचणीच्या वेळी ठोकलेल्या या शतकाची किंमत टीम इंडियालाच माहीत. पुजारने या शतकी खेळीदरम्यान आपल्या कसोटी कारकीर्दीतील 5 हजार धावाही पूर्ण केल्या. पुजाराने यासोबतच द्रविडच्या विक्रमासोबत चालण्याचा सिलसिलाही चालू ठेवला.

Video : कमिन्सच्या ‘सुपरमॅन थ्रो’वर पुजारा असा झाला रनाआऊट

पुजाराने 65 व्या कसोटीत 108 डावांमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठला. द्रविडने देखील कसोटीत 5 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 108 डाव घेतले होते. विशेष म्हणजे फक्त पाच हजारच नाही तर 3 हजार आणि 4 हजार धावाही दोघांनी सारख्याच डावात पूर्ण केल्या होत्या.

पुजारा- द्रविडचे विक्रमही बोलतात ‘हम साथ साथ है’ –

  • 3000 कसोटी धावा – 67 डाव
  • 4000 कसोटी धावा – 84 डाव
  • 5000 कसोटी धावा – 108 डाव
आपली प्रतिक्रिया द्या