राशीनुसार पेहराव

सामना ऑनलाईन। मुंबई

मेष – मेष राशीच्या व्यक्तींना स्टायलिश लूक विशेष आवडतो. कपडे व लूकबद्दल मेष व्यक्ती जागरुक असतात. काहीही घालायचं आणि ऑफिसला जायचं असं यांच्या बाबतीत होत नाही. कपड्यांची, फॅशनची यांना चांगली जाण असते. चारचौघात आपण कसे उठून दिसू हे यांना बरोबर कळते. महागड्या कपड्यांची यांना फार क्रेझ नसते. पण जे काही घालतील ते हटके नक्कीच असत. साधारणत इंडो वेस्टर्न कपड्यात यांच व्यक्तीमत्व अधिक उठून दिसतं.

वृषभ – या राशीच्या व्यक्ती फॅशन आयकॉन असतात. सतत नवीन फॅशन करण्याचा यांना ध्यास असतो. कधी जीन्स तर कधी फॉर्मल आणि मनात आलं तर बर्मुडा घालूनही ऑफिसला जायला या व्यक्ती मागेपुढे पाहात नाहीत. फॅशनबद्दल त्यांची स्वताची अशी एक व्याख्या असते. लोक काय बोलतील याच्याशी यांना काही देण घेण नसतं. या राशीच्या महिलाही कधी साडीत तर कधी जीन्स घालताना दिसतात. या राशीला सर्वच पोषाख शोभून दिसतात.

मिथुन – कपडे, फॅशन यांत या राशीच्या व्यक्तींना फार इंटरेस्ट नसतो. मोजकीच खरेदी करत असल्याने यांच्याकडे सिलेक्टेड कपडे असतात. पण जे घालतील ते ब्रँडेड. यामुळे चारचौघात साध्या कपडयातही या राशीच्या व्यक्ती भाव खाऊन जातात. मॉडर्न कपडे यांना विशेष आवडतात. फार टीपिकल दिसणं यांना आवडत नाही. जीन्स, टी शर्ट, ट्राऊझर व त्यावर फॉर्मल शर्ट पुरूषांना शोभून दिसतं. तर महिलांना पायघोळ ड्रेसेस आवडतात.

कर्क – या राशीतल्या व्यक्तींना खूप हायफाय राहणं जमत नाही. पण फॅशनच ज्ञान असतं. आवडल ते घालायचं मग ते शोभत असो वा नसो याच त्यांना काही पडलेलं नसतं. गडद रंग यांना आकर्षित करतो. बाजारात येणाऱ्या ट्रेंडकडे यांच लक्ष असतं. त्याप्रमाणे ते खरेदी करतात. पुरूषांना पारंपरिक पोशाख आवडतो तर महिलांचा कल बऱ्यापैकी मॉर्डन दिसण्याकडे असतो.

सिंह – ही राशी आक्रमक असली तरी फॅशनच्या बाबतीत भलतीच साधी आहे. हलके रंग यांना आवडतात. यामुळे साधे पण आरामदायी कपडे घेण्याकडे यांचा कल असतो. त्यातही मॉडर्न पण आकर्षक कपडे यांना सुट होतात. पुरूषांचा कल ट्राऊझर्स व शर्टकडे असतो तर महिलांची पसंती जीन्स शर्ट, व पारंपरिक कपड्यांकडे.

कन्या – यांच्याकडे कपड्यांचे भांडारच असते. आपल्याला काय चांगल दिसतं ते या राशीला चांगल कळत. यामुळे नीट विचार करून पारखून कपडे निवडतात. चारचौघात हटके दिसण्याचा यांचा प्रयत्न असतो. पण बऱ्याचवेळा या गडबडीत भलतीच खरेदी करतात व पस्तावतात. पुरूषांचा कल ट्राऊझर्स व शर्टकडे असतो तर महिलांची पसंती परंपरागत कपड्यांना असते.

तूळ – गडद रंग यांना विशेष आवडतात. फॉर्मल कपड्यांपेक्षा जॅकेट, स्वेट शर्ट, यासारख्या कपडे तूळ राशीवाल्यांना आवडतात. पण वेळ व जागा पाहून पेहराव करण्याची यांना सवय असते. उगाचच खरेदी करण्यापेक्षा मोजकेच पण आवश्यक कपडे घेण्याकडे यांचा कल असतो. जीन्सपेक्षा ट्राऊझर्सला पुरूषांची पसंती असते. तर महिलांना मॉर्डन व पारंपरिक पेहराव आवडतात.

वृश्चिक – महागडे कपडे घालायला वृश्चिक राशीला आवडते. पण वायफळ खर्च करणे जमत नसल्याने बऱ्याचवेळा साध्या कपड्यांची खरेदी करतात. पण त्यातही खुलून दिसतात. हलका रंग या राशीच्या व्यक्तींना शोभून दिसतो. पारंपरिक कपडे व प्रसंगी बोल्ड कपडे घालणे यांना आवडते. जीन्स, स्वेट शर्ट हा पुरूषांचा आवडता पेहराव तर इंडो वेस्टर्नला महिलांची पसंती असते.

धनु – ही मंडळी ज्यात आपले व्यक्तीमत्व खुलून दिसेल अशा कपड्यांच्या शोधात असतात. साधे हलक्या रंगाचे कपडे यांना आवडतात. खरेदीची आवड असते. पण उगाच पैसे खर्च करणे आवडत नसल्याने मोजके कपडे राखून असतात. पुरूषांचा कल ट्राऊझर्स व शर्टकडे असतो तर महिलांची पसंती पारंपरिक कपड्यांना असते.

मकर – आरामदायक कपडे यांना विशेष आवडतात. फार झगमग यांना आवडत नाही. हलके रंग यांना शोभून दिसतात. ट्रे्ंडी लूकमध्ये मकर राशीवाले अधिकच उठून दिसतात. जीन्स-टीशर्ट ,कुर्ता पायजमा मकर पुरूष पसंत करतात. तर महिलांना पारंपारिक कपड्यांचे वेड असते. फॅशन करताना शंभरवेळा विचार करतात.

कुंभ – चारचौघात उठून कसे दिसू याचा सतत विचार करतात. मोठ्या प्रिंटचे कपडे यांना आकर्षित करतात. हलक्या व गडद रंगाच्या शेड्स असलेल्या कपड्यांचे यांच्याकडे भांडारच असते. जीन्सपेक्षा ट्राऊझर आणि फॉर्मल शर्ट घालायला कुंभ व्यक्तींना आवडते. या राशीच्या महिलांना पारंपरिक कपड्यांबरोबरच मॉर्डन टच असलेले कपडे अधिक सुंदर दिसतात.

मीन – कपड्यांमध्ये एकसुरीपणा आला कि या व्यक्ती कंटाळतात. सतत नवीन फॅशनच्या शोधात असतात. फॅशन व रंगसंगतीची यांना चांगली जाण असते. त्यातही मॉर्डन कपडे यांना अधिक आकर्षित करतात. पण त्यातही पारंपरिक कपडे खरेदी करण्याकडे यांचा कल असतो. पण ते घालताना खूप विचार करतात. पुरूषांना कपडे खरेदीची आवड असते.कुर्ता पायजमा, सूट, जीन्स टी शर्ट मीनच्या पुरूषांना शोभून दिसतात. फार गडद कपडयांकडे या व्यक्ती बघत नाहीत. महिलांना साधी राहणी आवडते.