फळं खाल्ल्यावर पाणी पिणे योग्य की अयोग्य?

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

फळं खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते असे म्हणतात. फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामीन व अनेक उपयुक्त घटक असतात. ज्यांची आपल्या शरीराला आवश्यकता असते. दिवसातून किमान एक फळ खाणं गरजेच आहे. पण फळ खाल्ल्यावर पाणी पिणे मात्र टाळावे. का ते जाणून घेऊया.

  • सगळ्याच फळांमध्ये साखर व यीस्ट असते. पण त्याचबरोबर आपल्या पोटात असे काही अॅसिड असतात ज्यांच्यामुळे अन्नाचे पचन लवकर होते. यामुळे फळं खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास ते अॅसिडमध्ये मिसळते.
  • अन्नपचनक्रियेचा वेग मंदावतो. पोट फुगतं. तर कधी कधी पोट दुखू लागतं.
  • फळातही पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे काहीजणांना फळं खाल्ल्यानंतर जुलाब होतात.
  • फळ खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास पचनक्रिया तर मंदावतेच पण अपचनामुळे डोकेदुखी, अॅसिडीटी, पोट फुगणे यासारखा त्रास सुरू होतो.
  • यामुळे फळं खाल्ल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे. कारण तोपर्यंत खाल्लेल्या अन्नाचे पचन झालेले असते.