टिप्सः गरम पाणी प्या

सामना ऑनलाईन, मुंबई

पाणी हे जीवन आहे. पण हेच पाणी थोडं गरम करून प्यायल्याने ते औषधासारखे काम करते आणि त्याचा खूप फायदा होतो. नियमित  आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. दररोज एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

सकाळी उठल्यावर उपाशीपोटी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते आणि चेहऱयाची चमक वाढते.

केस आणि त्वचा चांगली राहण्यास गरम पाणी महत्त्वाचे कार्य करते. चेहऱयावर पुटकुळ्या, फोड येणे याचा त्रास असेल तर तो दूर होतो.  केस चमकदार होतात. खरेतर केसांच्या वाढीसाठी गरम पाणी पिणे आवश्यक आहे.

दमा, उचकीचा त्रास असलेल्यांनी नियमित गरम पाणी प्यावे. हे त्यांच्यासाठी उत्तम औषध आहे तर तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतरही गरम पाणी हितकारक आहे.

पाण्यामध्ये कॅलरी नसतात. याशिवाय सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातून टॉक्सिन बाहेर पडतात. त्यामुळे चयापचय क्रिया वाढते जे कॅलरी बर्न करण्यास उपयुक्त ठरतात.

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गरम पाण्यासोबत लिंबू व मध घ्यायला हवा. त्याचबरोबर वजन कमीं करण्यासाठीही हा उपाय फायदेशीर आहे.

सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी आणि रात्री जेवल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.