चीनने ब्रम्हपुत्रेचे पाणी अडवले, अरुणाचलमध्ये दुष्काळाचे सावट

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान विरोधात चीनकडून कुरापतींचे कारस्थान सुरुच आहे. चीनकडून हिंदुस्थानच्या सीमा भागात घुसखोरीच्या घटना ताज्या असतानाच आता तिबेटमार्गे हिंदुस्थानात प्रवेश करणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी अडवल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ब्रम्हपुत्रेचे पाणी अडवल्यामुळे अरुणाचल प्रदेशात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. याबाबत कॉंग्रेसचे खासदार निनोंग एरिंग यांनी केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि केंद्रीय परराषट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून याची माहिती दिली आहे.

अरुणाचलचे काँग्रेस खासदार निनोंग एरिंग यांनी केंद्रीय परराषट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अर्जुन राम मेघवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी थांबल्यामुळे अरुणाचल प्रदेशातील तूतिंग, यिंगकियोंग आणि पासीघाट या परिसरात दृष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करून चीनसोबत चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी खासदार एरिंग यांनी केली आहे. चीनने तिबेटमधून वाहणाऱ्या यारलुंग सांरपो नदीचे पाणी अडवले आहे. हीच यारलुंग सांरपो नदि जेव्हा अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिला सियांग नदी म्हणून ओळखले जाते. पुढे याच सियांग नदीला आसाममध्ये ब्रह्मपुत्र या नावाने ओळखले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या