मद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण

116

सामना ऑनलाईन। लंडन

इंग्लडमधील बर्कशायर येथे एका महिला सैनिकाने आपल्या पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पंचवीस वर्षीय महिला सैनिकाचे नाव कोरी एलिस होलमेस आहे. तिने गेल्या रविवारी दारुच्या नशेत रात्री तीनच्या सुमारास पुरुष सहकाऱ्याचे लैंगित शोषण केले. दरम्यान अधिकाऱ्यांनी महिलेवर कुठलीही कारवाई न करता तिला फक्त समज दिल्याने पुरुष सैनिकांनी याविरोधात आवाज उठवला आहे.

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी ज्या रेजीमेंटबरोबर जोडले गेलेले आहेत त्याच रेजींमेंटमध्ये  आरोपी महिला सैनिक काम करते . गेल्या रविवारी महिला सैनिकाने जास्त मद्यपान केले होते. त्याच अवस्थेत तिने आपल्या एका कनिष्ठ पुरुष सहकाऱ्याला केबिन मध्ये कामानिमित्त बोलावले. तो आत येताच तिने त्याच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हे बघताच पुरुष सहकाऱ्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याने महिलेला समजावण्याचा प्रयत्नही केला. पण ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने त्याचे लैंगिक शोषण केले. अखेर पुरुष सहकाऱ्याचा आवाज ऐकूण अनेकांनी महिलेच्या केबिनकडे धाव घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी महिलेला पुन्हा असे केल्यास लष्करातून हकालटपट्टी केली जाईल अशी समज देत सोडून दिले. महिलेचे कृत्य चुकीचे आहे हे माहित असतानाही तिच्यावर कारवाई न झाल्याने सर्वच पुरुष सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. जर तिच्या जागी एखाद्या पुरुष सैनिकाकडून हे कृत्य झाले असते तर त्याच्यावर मात्र कारवाई करण्यात आली असती. या दुजाभावाबद्दल पुरुष सैनिकांनी निषेध व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या