Video – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र प्रकार

6

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

दिवसभर दारू ढोसलेल्या एका महिलेने न्यूयॉर्क ते लास वेगास या विमानामध्ये जाम तमाशा केला. आपल्या पुढच्या सीटवर एक 3 वर्षांची मुलगी बसली आहे हे सहन न झाल्याने ही महिला तिच्या अंगावर थुंकली. हा प्रकार एका सहप्रवाशाने मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे.

या महिलेचं नाव व्हॅलरी गोन्झालेज असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. व्हॅलरीने विमानातील कर्मचाऱ्यांबरोबरही उद्धटपणा करत त्यांना शिवीगाळ केली. व्हॅलरी जेव्हा लास व्हेगासला विमानतळावर उतरली तेव्हा तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी तिने आजूबाजूच्या लोकांना लाथा मारायला सुरूवात केली आणि त्यांच्यावर थुंकतही होती. यामुळे पोलिसांनी तिला व्हीलचेअरवर बसवून पाय बांधले. तिला थुंकता येऊ नये म्हणून तिच्या तोंडावरही पट्टी बांधली.