बायकोपेक्षा दारूवर जास्त प्रेम, बेवड्याने पत्नीला ठार मारले

murder

सामना ऑनलाईन, जळगाव

बायकोपेक्षा दारूवर जास्त प्रेम करणाऱ्या बेवड्याने तिचा गळा आवळून खून केला आहे. आपल्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने सगळ्यांसमोर बायकोने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता, मात्र पोलीस तपासात त्याचं पितळ उघडं पडलं. मनीषा कोळी असं मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव आह. मनीषाचा योगेशशी ९ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर योगेश सातत्याने मनीषाला मारहाण करीत होता.

दोन महिन्यांपूर्वी मनीषाला योगेशने मारहाण केली होती, या मारहाणीत तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती असं मनीषाच्या घरच्यांनी सांगितलं आहे. मंगळवारी पहाटे योगेशने अचानक मनीषाला मारहाण करायला सुरुवात केली मारहाण करत असताना त्याने तिचा गळा आवळून खून केला आणि पहाटेच तिच्या आई-वडिलांना आत्महत्या केल्याचे सांगितले. वरणगाव पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली असता त्यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान योगेशची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान योगेशने मनीषाचा खून केल्याचं मान्य केलं.