वाढलेलं वय कमी करण्यासाठी 69 वर्षीय आजोबांची न्यायालयात धाव

सामना ऑनलाईन। द हेग

वाढणाऱ्या वयावर आपलं नियंत्रण नसतं. ते निसर्गचक्र असल्याने प्रत्येकजण वाढणार वयं स्वीकारत आयुष्यातला प्रत्येक दिवस आनंदाने जगत असतो. पण डेन्मार्क मधील 69 वर्षीय एमिल रेटलबॅंड या प्रेरक वक्ते असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला निसर्गाचा हा नियम मान्य नाही. आपलं वय जरी सत्तरीतलं असलं तरी आपण 20 वर्षाचा तरुण असल्याचा अनुभव करत आहोत. यामुळे न्यायालयाने माझ वय 69 वर्ष नाही तर 20 वर्ष करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती रेटलबॅँड यांनी न्यायालयाकडे केली. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

एमिल सध्या 69 वर्षांचे असून त्यांच वय 20 वर्ष करता येणार नाही. पण जर ते स्वत:ला 20 वर्षीय तरुण समजत असतील तर तसे वाटण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. यामुळे ते 20 वर्षीय तरुणाप्रमाणे जगू शकतात. पण त्यांचे वय 69 वर्षांहून 20 वर्ष करण्याचा आदेश आम्ही देऊ शकत नाही. कारण तसे केल्यास त्यांच्या लग्नाची तारीख, शाळेचा दाखला यांसह अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतील. जी एक किचकट कायदेशीर प्रक्रिया आहे.

एमिल यांनी त्यांचे वय 20 वर्ष करण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. पण त्यांच्या मूळ वयाच्या आधारावरच त्यांनी आजपर्यंत अनेक सरकारी सोयी सुविधांचा लाभ घेतला आहे. मग असे असताना त्यांना मानसिक समाधान देण्यासाठी त्यांचे वय 20 वर्ष करणे शक्य नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने एमिल यांची याचिका फेटाळली आहे. यावर न्यायालयाला जे योग्य वाटले त्यांनी तो निर्णय दिला आहे. यावर आपण समाधानी आहोत असे एमिल यांनी म्हटले आहे.