होय मी लेस्बियन आहे! प्रसिद्ध हिंदुस्थानी खेळाडूचा खळबळजनक खुलासा

90
फोटो- प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपण समलैंगिक असून आपल्याच मूळ गावी राहणाऱ्या एका तरुणीशी आपले प्रेमसंबंध असल्याचा खळबळजनक खुलासा एका खेळाडूने केला आहे. कोणत्याही हिंदुस्थानी खेळाडूने अशा प्रकारे उघडपणे समलैंगिकता मान्य करण्याची ही देशातली पहिलीच घटना आहे.

dutee-chand

न्यूज18ने दिलेल्या वृत्तानुसार, ही खेळाडू म्हणजे हिंदुस्थानी अॅथलीट आणि स्प्रिंटर दुती चंद आहे. हिंदुस्थानची स्टार खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुती चंद हिने समलैंगिक असल्याचं कबूल केलं आहे. तिच्याच गावी राहणाऱ्या एका तरुणीशी तिचे प्रेमसंबंध आहेत. मला ती व्यक्ती सापडली आहे, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन. ती व्यक्ती माझ्या गावचीच आहे. पण ती पुरुष नसून स्त्री आहे. मला वाटतं, प्रत्येक नात्यात स्वातंत्र्याची गरज आहे. मी नेहमीच समलैंगिक व्यक्तींच्या अधिकारांसाठी लढत राहीन, असं दुतीचं म्हणणं आहे.

सध्या आपलं लक्ष वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिकवर असल्याचं दुतीचं म्हणणं असून भविष्यात आपल्या समलैंगिक जोडीदारासोबत संसार थाटण्याची इच्छाही तिने बोलून दाखवली आहे. स्वतःच्या समलैंगिकतेविषयी जाहीरपणे कबुली देणाऱ्या दुतीने आपल्या जोडीदाराची ओळख मात्र सार्वजनिक केलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या