एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुन्हा, अंजली दमानियांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप

सामना प्रतिनिधी, मुंबई

माजी महसूलमंत्री, आमदार एकनाथ खडसे यांच्याविरोधात मनास लज्जा आणणारे वक्तव्य केल्याप्रकरणी भादवि कलम ५०९ अंतर्गत वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी जळगावमधील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

दमानिया यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खडसे यांनी आपल्यावर अश्लील शब्दांत टिका केली. या टिकेनंतर कार्यक्रमामध्ये हशा पिकला. खडसे यांचे हे वक्तव्य मनाज लज्जा निर्माण करणारे आहे. असा आरोप त्यांनी केला.