सुपर अर्थ ! वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

आपल्यासारखीच दुसरी पृथ्वी आहे का? मानवी जीवन दुसरीकडे अस्तित्वात आहे का? या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली? अनादी अनंतकाळापासून पडलेल्या या प्रश्नांची उकल होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. वैज्ञानिकांनी पृथ्वीपासून सहा प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘सुपर अर्थ’चा शोध लावला आहे. या ‘सुपर अर्थ’मुळे ब्रह्मांडाची अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे.

जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘नेचर’मध्ये या ‘सुपर अर्थ’संदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे. पृथ्वीपासून सहा प्रकाशवर्षे दूर असलेला हा ग्रह ‘बर्नार्ड स्टार’ म्हणून ओळखला जातो. पृथ्वीच्या सौरमंडलाबाहेर असलेला हा ग्रह बर्फाळ असून यावर एक धूसर दुनिया असून ती पृथ्वीपेक्षा 3.2 पट वजनदार आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस स्टडीजच्या स्पेन येथील शाखेचे इग्नासी रिबास यांनी या शोधाला पुष्टी दिली असून, हा शोध मोलाचा असल्याचे म्हटले आहे.