अंदमान निकोबार मध्ये भूकंप, सुदैवाने जीवितहानी नाही

2
earthquake-measurement

 सामना ऑनलाईन । पोर्ट ब्लेअर

अंदमान निकोबार बेटावर बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. हा धक्का सहा रिश्टर इतका होता. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अंदमान निकोबार दीप जवळील समुद्राच्या स्तरात कुठलीच वाढ नसल्याने त्सुनामीचा कुठलाच इशारा दिलेला नाही.

हा भूकंप सकाळी आठ वाजून 43 मिनिटांनी झाला. त्याचे केंद्र निकोबार द्वीपच्या क्षेत्रात होता. या भूकंपात कुठलीही जीवितहानी न झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. भुकंपाच्या वेळी लोकांनी घराबाहेर पडून खुल्या मैदानात धाव घेतली.

याआधी मागच्या वर्षी गुजरातमध्ये आणि जम्मू कश्मीरमध्येही भूकंपाचे झटके जाणवले होते. गेल्या वर्षी इंडोनेशियामध्ये झालेल्या भुकंपात 400 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 2018 साली झालेल्या भुकंपात 2800 लोकांना आपला जीव गमावावा लागला होता.