सांगली, सातऱ्यासह रत्नागिरीत भूकंपाचे धक्के

सामना ऑनलाईन । सातारा

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागाला आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीक्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी असून कोयना परिसरापासून २१ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. साताऱ्यातील कराड, सांगलीतील कडेगाव आणि रत्नागिरीतील देवरुख, संगमेश्वर, चिपळूण परिसरातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

सांगलीतील अनेक भागांत भूकंपाचे सर्वाधिक हादरे बसले. कोयना परिसरापासून २१.६ किलोमीटरवरील वारणा खोऱयातील जावळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. यात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही.