सात राज्यांत भूकंपाचे हादरे

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन ।   श्रीनगर

भूकंपाच्या झटक्यांनी सात राज्यांना हादरा बसला. बुधवारी सकाळी 5.15 वाजता जम्मू-कश्मिरात भूकंपाचा आणि सकाळी 10.20 वाजता आसाम, मणीपूर, पश्चिम बंगाल आणि बिहार हादरले. सर्वात जास्त तीव्रता आसाममध्ये होती. सुदैवाने जिवित वा वित्तीय हानी झाल्याचे वृत्त नाही.

जम्मू-कश्मिरात 4.7 , हरियाणात 3.9, आसाममध्ये  5.5 रिश्टर स्केलची भूकंपाची तीव्रता होती. 15 ते 20 मिनिटे आसाम, पश्चिम बंगाल, मणिपूर, नागालँड, बिहार येथे नागरिकांमध्ये घबराट पसरली. घराबाहेर लोक पळाले.

पश्चिम बंगालमध्ये तरूणाचा मृत्यू

भुकंपाच्या हादऱयांमुळे लोकांमध्ये घबराहट पसरली. मात्र, सुदैवाने कुठेही जिवित आणि वित्तीयहानी झाली नाही असे सरकारी सूत्रांनी सांगितले. पश्चिम पंगालमध्ये सिलीगुडी येथे भुकंपाच्या हादऱ्यानंतर लोक इमारतीबाहेर पळाले. इमारतीतून बाहेर पडताना 22 वर्षाचा तरूण पाय घसरून पडला आणि डोक्याला जबर मार लागल्यामुळे मृत्यू झाला आहे.