चष्मा घालवण्यासाठी काही सोपे उपाय

सामना ऑनलाईन । मुंबई

आजकाल कमी वयात चष्मा लागणे ही सामान्य गोष्ट आहे. अगदी लहान मुलांनाही चष्मा लागतो. काही वेळा लवकर चष्मा लागण्याचे आनुवंशिकता हेही कारण असू शकते. काही घरगुती उपचार, डोळ्यांची योग्य निगा आणि चौरस आहार घेतल्यासही चष्मा लवकर दूर होऊ शकतो.

  • पायाच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालीश करून झोपावे.
  • सकाळी अनवाणी पायांनी हिरव्यागार गवतावर चालावे.
  • अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यास डोळ्यांची कमजोरी दूर होईल.
  • शेंगदाण्याच्या आकाराएवढी तुरटी गरम करून त्याची पूड करा. शंभर ग्रॅम गुलाबपाण्यामध्ये ही पूड टाका. दररोज संध्याकाळी या गुलाबपाण्याचे चार-पाच थेंब डोळ्यात टाका. पायाला शुद्ध तुपाने मालीश करा.
  • कृष्णतुळशीच्या पानांचा २-२ थेंब रस १४ दिवस डोळ्यांमध्ये टाकल्यास रातांधळेपणा या आजारावर गुण येतो. या उपायामुळे डोळ्यातील पिवळेपणाही दूर होतो.
  • सूर्यफुलांच्या बियांचे सेवन डोळ्यांसाठी गुणकारी आहे. सूर्यफुलांच्या बियांचे सेवन केल्यास डोळ्यामधील कमजोरी दूर होण्यास मदत होते.
  • केळं, ऊस डोळ्यांसाठी लाभदायक आहे. उसाचा रस प्यायल्यास फायदा होतो. एका लिंबाचा रस एक ग्लास पाण्यामध्ये टाकून प्यायल्यास दृष्टी स्वच्छ राहाते.
  • दररोज पाच कप ग्रीन टी प्यायल्यास शरीराला अॅन्टीऑक्सिडंट मिळतात. त्यामुळे डोळे स्वस्थ राहतात.
  • डोळ्यातून पाणी येणे, दुर्बलता इत्यादी आजार असल्यास रोज रात्री आठ बदाम भिजवून ठेवा. सकाळी हे बदाम वाटून पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.
  • पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांवर सूज येते. त्यामुळे पाणी जास्त प्यावे. काकडी किंवा बटाटय़ाच्या चकत्या कापून डोळ्यांवर ठेवाव्यात.