आम्ही खवय्ये : विविध कोशिंबिरी

11

ज्येष्ठ कलावती प्रतिभा मतकरी. घरचं अन्न, सात्त्विक खाणं यावर विशेष भर.

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – स्वतःची भूक भागेल आणि मन शांत होईल असा खाण्याचा पदार्थ.

खायला काय आवडतं? – सर्व पदार्थांमध्ये पिठलं-भात सगळय़ात जास्त आवडतं.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – फार खाण्या-पिण्याची काळजी कधीच केली नाही. कारण खूप काम करायचं आणि जे मिळेल ते खायचे

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – सहा महिन्यांतून एकदा बाहेरचं खाणं होतं.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?- पूर्वी पंजाबी हॉटेलमध्ये जायला आवडायचं. आता चायनिज, थाय फूड आवडतं.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? -रात्री साडेनऊ वाजता प्रयोग असला, तरीही सकाळी अकरापर्यंत जे खाल्लेलं असेल त्यानंतर प्रयोग संपेपर्यंत काही खात नाही. तेव्हाही जे असेल, मिळेल ते खाते. मनापासून मांसाहाराची आवड नाही.

दौऱयादरम्यान आवडलेला खास पदार्थ ? – कोकणात खाल्लेले उकडीचे मोदक.

स्ट्रिट फूड आवडतं का? – गोदावरीच्या तीरावर दही बटाटा पुरी आवडली होती.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – पोळी-भाजी, मुळा, काकडी, गाजर किंवा बुंदी रायतं वेगवेगळय़ा प्रकारच्या कोशिंबिरी मला खूप आवडतात.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? – खिमा, तळलेले मासे, कोलंबी, चिकन, मटण असे मांसाहारी पाहुण्यांसाठी हे पदार्थ ठरलेले असतात. शाकाहारींसाठी मला फ्राईड राईस करायला आवडतो. माझ्या आईने शिकवला आहे. गोड पदार्थांत श्रीखंड-पुरी किंवा बासुंदी पुरी.

फ्राईड राईस
बासमती किंवा आवडते तांदूळ धुऊन भिजत घालायचे. बदाम भिजत घालून ठेवायचे. त्यानंतर काजू, बेदाणे, किसमिस, भरपूर वेगवेगळय़ा प्रकारच्या भाज्या यांमध्ये फरसबी, गाजर, फ्लॉवर, कांदा, बटाटा, भोपळी मिरची बारीक चिरून घ्यायच्या. काजू, बेदाणे, बदाम बारीक तुकडे करून तळून घ्यायचे. कांदाही बारीक चिरून घ्यायचा. नंतर तूप-जिऱयावरच्या फोडणीत कांदा परतून घ्यायचा. तिखट, हळद, मिरी, दालचिनी, तमालपत्र, लवंगा हा गरम मसाला फोडणीतच घालायचा. भाज्या सगळय़ा छान परतून घ्यायच्या. त्यानंतर तांदूळ परतून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. पाणी घालायचं. मग वरून बेदाणे, बदाम, काजू घालायचे. छान वाफ येऊ द्यायची.

आपली प्रतिक्रिया द्या