केळ्याच्या अतिसेवनाने बळावतो हृदयविकार

सामना ऑनलाईन। मुंबई

केळी ही शरीरासाठी फायदेशीर असून केळ्यांचे नियमित सेवन केल्याने वजन वाढते. त्यातील (व्हिटामिन्स) जीवनसत्व व खनिज( मिनरल्स) यामुळे शरीर सुदृ्ढ होते. यामुळे आपल्यापैकी अनेकजण फिट राहण्यासाठी भरमसाठ केळी खातात. पण केळ्याचे हे अतिसेवन तुमच्या जीवावर बेतू शकतं असं संशोधनातून समोर आलं आहे.

केळ्यामध्ये भरपूर पोटॅशिअम व मिनरल्स असतात. जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. शरीरातील प्रत्येक लहानमोठ्या पेशींमध्येही पोटॅशिअम असतं. जो आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाणही संतुलित राहते. यामुळे जर तुम्ही पाचहून अधिक केळी खाल्लीत तर तुमच्या शरीरातील पोटॅशिअमचं प्रमाण वाढतं. ज्यांचा थेट परिणाम रक्तवाहीन्या व कोषिकांवर वर होतो. हे प्रमाण कमी वा अधिक झालं तरी हृद्यावर त्याचा ताण पडतो. रक्तदाब वाढतो व हृद्यविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक बळावतो. यामुळे एकाहून अधिक केळी खाताना आपल्या शरीरातील पोटॅशिअम व मिनरल्सचे प्रमाण तपासून पाहावे. आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर केळी खावीत.

summary-eating-more-banana-can-risk-your-life-