लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण एनडीएला 352 जागांवर विजय

133

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले असून एनडीएला 352 जागा मिळाल्यात आहेत. अरुणाचल प्रदेशचे मधील अरुणाचल पश्चिम मतदारसंघाचा निकाल उशीरा लागला. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केले आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांसह आपलाही राजीनामा सादर केला आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंत 541 मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले होते परंतु किरण रिजिजू यांच्या अरुणाचल प्रदेश जागेची मतगणना बाकी होती, त्यामुळेच अखेरचा निकाल अडकला होता.

अखेरच्या मतगणनेनंतर मिळालेल्या आकडेवारीनुसार भाजपला 303 जागांवर जागा मिळाल्या आहेत. भाजपनंतर शिवसेना सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. शिवसेनेला 18 जागा मिळाल्या असून जदयुला 16 लोक जन शक्ति पक्षाला 6 जागा मिळाल्या आहेत.

काँग्रेसला अवघ्या 52 जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला 8 जागा जास्त मिळाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या