मोदींवरील वेबसीरीज काढून टाका, इरॉस नाऊला निवडणूक आयोगाचे आदेश

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित चित्रपट पीएम मोदी हा निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडल्यानंतर आता इरॉस नाऊवरील मोदींवर आधारित वेबसिरीजही आयोगाच्या कात्रीत सापडली आहे. ही वेबसीरीज ताबडतोब हटवावी असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

इरॉस नाऊने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर मोदी या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. 3 एप्रिल रोजी ही वेबसीरीज प्रदर्शितही झाली आहे. निवडणूक आयोगाने दखल घेत या वेबसिरीजवर बंदी घातली आहे. तशी नोटीसच त्यांनी इरॉस नाऊला पाठवली आहे. तसेच पुढील सूचना मिळत नाही तोपर्यंत ही वेबसिरीज न दाखवण्यास आयोगाने मनाई केली आहे.