३६० महिलांची फसवणूक, भामट्या पती-पत्नी गुन्हा दाखल

पुणे: विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली भामट्या पती-पत्नीने सैय्यदनगर भागातील ३६० महिलांची तब्बल ४ लाख ८० हजार रूपयांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अब्दुलबारी अब्दुलबासीत कुरेशी, यास्मीन कुरेशी (दोघे रा. ४३८, सेंटर स्ट्रीट, लष्कर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फरीदा सैय्यद (वय ५४, रा. सैय्यदनगर, हडपसर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुलबारी व त्याची पत्नी यास्मीन हे दोघे हडपसरमधील सैय्यदनगर, महंमदवाडी भागात फिरून महिलांना भेटत. सरकारच्या विविध योजनांचा फायदा मिळवून देतो सांगून त्यांचे खोटे दस्ताऐवज तयार घेतले, काम करून देण्यासाठी प्रत्येकीकडून ५ ते १० हजार रूपये घेतले. तसेच त्यांच्या नावाने कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना कामाचा योग्य मोबदला म्हणून कमीशनही दिले जाईल असे अमिषही दाखविले. २०१६ ते पेâब्रुवारी २०१७ पर्यंत या दोघांनी अशा प्रकारे सुमारे ३६० महिलांकडून तब्बल ४ लाख ८० हजार रूपये गोळा केले. परंतू, पैसे घेऊनही लाभ मिळाला नाही व कर्जाचे कमीशनही मिळाले नाही. त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विवेक पवार करत आहेत.