महागाई तापणार,आणखी चटके बसणार

17

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

२०१८-१९ मध्ये देशातील जनतेला महागाईचे आणखी चटके बसण्याची शक्यता आहे, असे आर्थिक सवेक्षण अहवालात म्हटले आहे. अर्थव्यवस्थेत सुधार होऊन ‘जीडीपी’ (सकल घरेलू उत्पादन) ७ ते ७.५ टक्के राहील असाही अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमती भडकत असल्याने सरकारची वित्तीय तूटही वाढणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेत सादर केला. चालू आर्थिक वर्षांत  २०१७-१८ मध्ये जीडीपी केवळ ६.७५ टक्के राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अर्थव्यवस्थेच्या घसरणीमागे नोटाबंदी जबाबदार असल्याचे तज्ञांचे मत आहे. मात्र, २०१८-१९च्या आर्थिक वर्षांत जीडीपीत सुधारणा होऊन ७ ते ७.५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असे आज आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे.

जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर भरणाऱयांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ.  चालू आर्थिक वर्षांत कृषी क्षेत्राचा विकासदर २.१ टक्के राहील. हवामान बदलाचा फटका शेती उत्पादनाला बसेल.

इंधन दरवाढ, वित्तीय तुटीचा जनतेला फटका

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १२ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त केली आहे. याचा थेट फटका जनतेला बसेल. सध्या पेट्रोल ८० रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ६५ रुपयांवर गेले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास देशात इंधनाचे दर भडकतील आणि पर्यायाने महागाई वाढेल. तसेच सरकारची वित्तीय तूट सरासरी ३.३ टक्के राहणार आहे. त्याचाही फटका जनतेला बसेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या