लालूप्रसाद कुटुंबीयांची ४५ कोटींची मालमत्ता जप्त

38

सामना ऑनलाईन । पाटणा/नवी दिल्ली

‘आयआरसीटीसी’ हॉटेल मनी लॉन्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने  पाटणातील ११ जागा ताब्यात घेतल्या. त्याची किंमत ४५ कोटी आहे. प्रिव्हेन्टिंग ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्टनुसार ही कारवाई करण्यात आली. लालूप्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी, तेजप्रताप आणि आरजेडीचा आमदार अबू दुजाना याची मालकीच्या या जागात आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या जागांवर सरकारी मालमत्ता असल्याची कागदपत्रे लावण्यात आली आहेत. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी पटनातील दोन ‘आयआरसीटीसी’ हॉटेलचे कंत्राट देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या