पुन्हा अग्नितांडव!

हिंदुस्थानसारख्या देशात तर अपघाती मृत्यूंमध्ये सुमारे सहा टक्के मृत्यू आगीच्या दुर्घटनांमुळे होतात. त्यात आता कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडवाची भर पडली. मक्का येथेही चेंगराचेंगरी होते किंवा लंडनसारख्या इंग्लंडच्या राजधानीतील ४५ मजली टॉवरलाही आग लागून ७० लोकांचा बळी जातो, अशी उदाहरणे देऊन आपल्याकडील दुर्घटनांवर पांघरूण घालता येणार नाही. मुंबईमध्ये पुन्हा झालेल्या अग्नितांडवाने हाच इशारा दिला आहे.

मुंबईकरांच्या दुर्दैवाचे दशावतार संपता संपत नाहीत. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत २३ निष्पापांचे बळी गेले. त्या अपघातग्रस्तांच्या किंकाळ्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश आजही हृदय चिरत आहे. त्याचवेळी लोअर परळमधील कमला मिल कंपाऊंडमधील एका हॉटेलास गुरुवारी मध्यरात्री आगीच्या ज्वाळांनी गिळले. त्या ज्वाळांनी १४ निरपराधांचे प्राण घेतले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच हा भयंकर प्रकार घडला आहे. नवीन वर्षाच्या आधी किंवा १५ ऑगस्ट – २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला मुंबईसाठी ‘हाय अॅलर्ट’चे इशारे-नगारे नेहमीच वाजविले जातात. कारण मुंबईला दहशतवाद्यांचा धोका नेहमीचाच आहे, पण अचानक होणाऱ्या दुर्घटनांचे काय? त्यांचा धोका माहीत असूनही ना इशारे आधी मिळतात ना नगारे पिटले जातात. कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस या इमारतीच्या गच्चीवर असलेल्या ‘वन अबव्ह’ या बारमध्ये अशीच अचानक दुर्घटना घडली. ‘पार्टी’ एन्जॉय करणाऱ्यांना पुढील काही मिनिटांत ज्या ठिकाणी आपली पावले थिरकत आहेत तेथे साक्षात मृत्यू तांडव करेल, आगीच्या ज्वाळा थयाथया नाचतील आणि आपल्याला स्वाहा करतील याची जराही कल्पना नसेल. पण दुर्दैवाने

अघटित
डलेच. या आगीने शेजारच्या ‘मेजोस ब्रिस्टो’ या पबलाही कवेत घेतले. १४ जणांचा बळी आणि १२ जणांना जीवन-मरणाच्या हेलकाव्यावर ठेवूनच हे तांडव शांत झाले. आता या प्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करावी अशीही मागणी झाली आहे. त्यानुसार पुढील सर्व कारवाई होईलच. पण कालच्या दुर्घटनेत हकनाक गेलेल्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे काय? मागील काही वर्षांत आगीच्या दुर्घटना मुंबईत वाढताना दिसत आहेत. गेल्यावर्षी दक्षिण मुंबईतील मेट्रो हाऊस या चार मजली इमारतीला आग लागली होती. त्यात जीवितहानी झाली नव्हती तरी दक्षिण मुंबईतील जुन्या लाकडी इमारती आणि तेथील अग्निसुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला होता. दोन वर्षांपूर्वी काळबादेवीतील अग्नितांडवात अग्निशमन दलाचे दोन होनहार अधिकारी कर्तव्य बजावताना शहीद झाले होते. मुंबईतील चिंचोळय़ा आणि गजबजलेल्या परिसरात आग लागली की काय अनर्थ होऊ शकतो याची जाणीव या दुर्घटनेने करून दिली होती. अंधेरीतील ‘लोटस बिझिनेस पार्क’ला लागलेल्या आगीवेळी नितीन इवलेकर हे जवान शहीद झाले होते. मुंबईत आजपर्यंत घडलेल्या प्रत्येक आगीच्या दुर्घटनेवेळी आगविषयक नियम आणि

उपाययोजनांचे उल्लंघन
सेच महापालिका प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आणि संबंधित मालक यांच्यातील साटेलोटे, त्यामुळे निरपराध व्यक्तींचे धोक्यात येणारे जीव अशा गोष्टींवर चर्चा झडल्या. तरीही कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडव घडलेच. कारण मुंबईतील अनेक टॉवर्समध्ये, हॉटेल्स, मॉल्स किंवा पब्जमध्ये फायर ऑडिट आणि फायर एक्झिटची सुविधा याबाबतीत जीवघेणी बेपर्वाई आहे. खरे म्हणजे अग्निसुरक्षा म्हणा, आपत्ती व्यवस्थापन म्हणा किंवा गर्दी व्यवस्थापन, मुंबई-महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्याकडे सर्वत्रच ढिसाळपणा आहे. त्यातूनच कुठे शाळेतील मध्यान्ह भोजन अग्नितांडवाच्या रूपात शंभरावर शाळकरी मुलांचा ‘घास’ घेते, कुठे यात्रा किंवा धार्मिक उत्सवांत चेंगराचेंगरी होऊन शेकडो बळी जातात. हिंदुस्थानसारख्या देशात तर अपघाती मृत्यूंमध्ये सुमारे सहा टक्के मृत्यू आगीच्या दुर्घटनांमुळे होतात. त्यात आता कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडवाची भर पडली. मक्का येथेही चेंगराचेंगरी होते किंवा लंडनसारख्या इंग्लंडच्या राजधानीतील ४५ मजली टॉवरलाही आग लागून ७० लोकांचा बळी जातो, अशी उदाहरणे देऊन आपल्याकडील दुर्घटनांवर पांघरूण घालता येणार नाही. मुंबईमध्ये पुन्हा झालेल्या अग्नितांडवाने हाच इशारा दिला आहे.

 • mahendrapadalkar

  टेरेसवर रेस्टॉरंट ही आदित्य ठाकरे ची संकल्पना.
  शिवसेनेच्या मुंबई म.न.पा. ची अंमलबजावणी.
  नोटबंदि रांगेत म्रुत्यु……… मोदी जबाबदार.
  आता आदित्य ला जबाबदार धरून रोज शिमगा करणार का. काही तरी खुसपट काढून, ओढूनताणून रोज अग्रलेख लिहून आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणारे संपादक रडतराऊत आता मात्र गुपचूप आहेत.

 • Gajanan Tandel

  या घटनेशी मोदीजांचा संबंध जोडायला जमले नाही का ? अहो जोडून टाकायचा नाही का ? एक अजून विनोद झाला असता तुमचा .