दीपिका-रणवीरचं; ठरलं रे ठरलं !

सामना ऑनलाईन। मुंबई

मस्तानी दीपिका पदुकोण आणि बाजीराव रणवीर सिंह यांच्या चाहत्यांसाठी गोड बातमी आहे. हे दोघे लवकरच बोहल्यावर चढणार असून लग्नाच्या शॉपिंगसाठी ते परदेशी रवाना झाले आहेत. दीपिका दक्षिणेकडील असल्याने दाक्षिणात्य पध्दतीने हे लग्न होणार आहे.

एका हिंदी सिनेमासिकाने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार अनुष्का व विराटप्रमाणेच दीपिका व रणवीरला ‘डेस्टीनेशन वेडींग’ करायच आहे. पण रणवीरचे बहुतेक नातेवाईक मुंबईत असल्याने व एवढ्या सगळ्यांना परदेशात जाणे शक्य नसल्याने मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्येच लग्न व्हावे अशी रणवीरच्या घरच्यांची इच्छा आहे. गेल्याच आठवड्यात दीपिकाचे आई वडिल रणवीरच्या घरच्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यात लग्नाची बोलणी झाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणही केले.

लग्नानंतर मुंबईतच दिमाखदार रिसेप्शन सोहळा व पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. लग्नाची तारीख ठरल्यामुळे आनंदात असलेले हे लव्ह बर्डस २ मार्चलाच लंडन व इतर देशात शॉपिंग करण्यासाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे पद्मावत चित्रपटानंतर ही जोडी परदेशातही हीट झाल्याने यावेळी त्यांनी आपल्या सोबत बॉडी गार्डसही नेले आहेत.

दरम्यान दीपिकाला पाठदुखीचा त्रास होत असल्याने तिने ३-४ महिन्याचा कामापासून ब्रेक घेतलाय . पण खरं तर लग्नाची तयारी करण्यासाठीच तिने हा ब्रेक घेतल्याची चर्चा आता सुरु झालीय.