इन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले? गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून अधिक लाईक्स

2

सामना ऑनलाईन, मुंबई

लोकांना आभासी जगात काय आवडेल याचा नेम नाही. एका अंड्याचा फोटो लोकांना इतका आवडला की तो फोटो इन्स्टाग्रामवर आजवरचा सगळ्यात प्रसिद्ध फोटो बनला आहे. मॉडेल कायली जेनरने तिच्या बाळासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोला मिळालेले लाईक्स बघता हा फोटो सर्वाधिक प्रसिद्ध फोटो असेल असं वाटलं होतं. मात्र अंड्याने या बाळाच्या फोटोला पछाडत पहिला क्रमांक मिळवला आहे.

This egg just broke the record of most likes on @instagram with 18 million, beating @kyliejenner. Whaaaa?

47.8k Likes, 565 Comments – world_record_egg (not) ‍♀️ (@streetartglobe) on Instagram: “This egg just broke the record of most likes on @instagram with 18 million, beating @kyliejenner….”

इन्स्टाग्रामवर अंड्याच्या फोटोला 2 कोटी 69 लाख 81 हजार 254 लाईक्स मिळाले आहेत. कायली जेनरने पोस्ट केलेल्या फोटोला 1 कोटी 80  लाईक्स मिळाले आहेत. @world_record_egg या अज्ञात इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या अंड्याचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्याखाली मजकूर होता की “चला एकत्र मिळून विक्रम करूयात या अंड्याला सर्वात जास्त लाईक्स मिळवून देऊयात”