अंडे का फंडा! टोपीवर 735 अंडी ठेवत रचला विक्रम

गिनिज बुकात आपले नाव यावे यासाठी कुणी काय करेल, याचा काही नेम नाही. एका व्यक्तीने आपल्या टोपीवर एक-दोन नव्हे तर तब्बल 735 अंडी ठेवत अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा कारनामा पाहून नेटिझन्सदेखील अवाक झाले आहेत. हा अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या व्यक्तीचे नाव ग्रेगरी दा सिल्वा असे आहे. तो पश्चिम आफ्रिकेतील बेनिनचा रहिवासी आहे. हा विक्रम रचण्यासाठी ग्रेगरीला तीन दिवसांचा कालावधी लागला आहे.