हे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवानगी देणारे पहिले अरब राष्ट्र

सामना प्रतिनिधी । कैरो

पति-पत्नी मधील शारीरिक संबंधांमधील दुरावा आणि त्यामुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे घटस्फोटांचे प्रमाण या कारणांमुळे इजिप्त देशाने मोठा निर्णय घेतला आहे. इजिप्तने महिलांची कामोत्तेजना वाढवण्यासाठीच्या औषध निर्मिती आणि विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे महिलांसाठी वियाग्रा बनवण्याचा आणि विक्रीला परवानगी देणारे इजिप्त हे जगातील पहिले अरब राष्ट्र ठरले आहे.

इजिप्तमध्ये घटस्फोटांचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी या मागचे मुख्य कारण पती-पत्नी मधील शारीरिक संबंधामधील दुरावा असल्याचे म्हटले आहे. या देशात दर 10 महिलांमागे तीन महिलांना कामोत्तेजना कमी असल्याचे निरीक्षणात पुढे आले आहे. त्यामुळे महिलांसाठी कामोत्तेजना वाढवणारे औषध निर्मितीसाठी व त्याच्या विक्रीसाठी येथे परवानगी देण्यात आली आहे. ‘फिमेल वियग्रा’ म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या या औषधाला शास्त्रीय भाषेत ‘फ्लिबानसेरिन’ असे संबोधले जाते. इजिप्तमधील एक स्थानिक कंपनी या औषधाची निर्मिती करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या