#Pulwama Attack Live Updates- देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, 44 जवान शहीद

45

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात आधी 20 जवान शहीद झाले होते. तसेच अनेक जवान गंभीर जखमी झाले होते. आता शहिदांचा आकडा 44 वर पोहोचला आहे.  शहींदामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र राहुल बजरंग करांडे यांचाही समावेश आहे.

दहशतवाद्याने 200 किलोहून अधिक स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ कार जवानांच्या ताफ्यावर धडकवली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवाद्यांनी संघटनेने या हल्ल्याची स्वीकारली आहेत.

 • सीआरपीएफचे डीजी केंद्रीय गृहमंत्र्याच्या भेटीला.
 • या हल्ल्यामागे पाकिस्तानाच हात असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.
 • तसेच उद्या सकाळी 9 वाजता मंत्रिमंडळाची सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठकही बोलावण्यात आली आहे.
 • दहशतवाद्यांच्या कारने धडक दिलेल्या बसमध्ये 45 जवान होते
 • शहिद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना फोन करून घेतली हल्ल्याची माहिती

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख यांनी पुलवामा हल्ल्याचा केला निषेध.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला हल्ल्याचा निषेध

 • देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, 30 जवान शहीद; पीटीआयची माहिती
 • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या बैठक घेणार

 • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी जम्मू-कश्मीरमध्ये जाणार

  • जवानांच्या ताफ्यात 70 गाड्या होत्या

 • देशातील महत्वाच्या शहरांमधील सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे
 • जम्मू-कश्मीरमध्ये हाय अॅलर्ट जारी
 • अवंतीपुरा भागात सुरक्षा वाढवण्यात आली
 • या काफिल्यात 2500 हिंदुस्थानी जवान होते, काफिल्यातील दोन बसला लक्ष्य करण्यात आले
 • आदिल अहमद उर्फ वकास हा आत्मघाती दहशतवादी त्या कारमध्ये बसल्याच्या बातम्या येत आहेत, कश्मीरवाला या स्थानिक वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे

jem-terrorist-pulwama

 • सर्व प्रकारच्या शक्यतांचा तपास सुरू
 • जम्मू-श्रीनगर महामार्गावर जवानांच्या ताफ्यावर झालेला हल्ला आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता
 • 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या वेळी कश्मीरमध्ये सात वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते
 • आजतकच्या प्रतिनिधीच्या रिपोर्टनुसार सात दिवसांपूर्वीच अशा हल्ल्यांचा अॅलर्ट देण्यात आला होता

पहा फोटोगॅलरी:

 

 

पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा भागातून सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जात असताना रस्त्याच्या कडेला पार्क असलेल्या गाडीत मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यातील आठ जवान शहीद झाले तर बारा गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पुलवामा जिल्हयात बुधवारी नरबाल भागातील फलाही- मिल्लत या एका खासगी शाळेत झालेल्या स्फोटात 10 विदयार्थी जखमी झाले होते.