मी महाराष्ट्रातील आडवाणी! खडसेंची खंत

सामना प्रतिनिधी । जळगाव

जिह्यात भाजप येण्यापूर्वीपासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. पक्षाला वाढवण्यासाठीही कष्ट उपसले. नव्यांना संधी देऊन जुन्यांना मार्गदर्शक करून पक्षाने माझ्यावर अन्याय केला. आता माझी अवस्था ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासारखीच झाली आहे अशी भाजपविरोधातील खदखद माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

शहरातील औद्योगिक वसाहतीतील बालाणी रिसॉर्टमध्ये कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी बोचणारी सल व्यक्त केली.

खडसे यांची प्रसूतीवेदना पक्षाने समजून घ्यावी. ती समजत नसेल तर गर्भपात करा असा टोला जिल्हाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील यांनी पक्ष श्रेष्ठाrला लगावला.

जलसंपदामंत्री महाजन येताच खडसेंनी भाषण थांबवत समर्थकांसह मेळाव्यातून काढता पाय घेतला. भाऊ बसा ही महाजनांची विनंतीही त्यांनी धुडकावली.