विचारतात नाथाभाऊ, दादा मी कुठे जाऊ?

सामना प्रतिनिधी । जळगाव

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपला घरचा आहेर देत आहेत. आज ते चक्क अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. पण मंचावर त्यांची काय चर्चा झाली?

दादा
नाथाभाऊ, तुमच्यावर अन्याय होत असल्याचे बघवत नाही. तुम्ही आमच्या पक्षात या आणि आमचे नेते व्हा!

भाऊ
आम्ही एकाच मंचावर आहोत. पण जे तुमच्या (उपस्थितांच्या) मनात आहे ते माझ्या नाही. माझ्या मनात जे आहे ते मी दादांच्या कानात सांगितले.

दादा
नाथाभाऊंनी कानात काय सांगितले हे मी सांगणार नाही. नाहीतर भाजपवाल्यांना झोप लागणार नाही.