मुख्यमंत्र्यांना टोला लगावत खडसेंनी केलं नववर्षाचं स्वागत

सामना ऑनलाईन । नांदुरा

नवीन वर्षात बोंड अळीचा प्रादूर्भाव होवू नये, अशी आशा व्यक्त करताना आमचा केवळ अभ्यास करण्यातच वेळ जातो, असा सणसणीत टोला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. यामुळे मुख्यमंत्री तसेच भाजप आणि खडसे यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. खडसेंनी सरकारविरोधातील टिकेला आणखी धार आणल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

एकनाथ खडसे हे पक्षावर जबरदस्त नाराज आहे. त्यांची नाराजी त्यांनी अनेकदा उघड बोलून दाखवली आहे. मात्र तरही पक्षात कोणताही फरक पडलेला पाहायला मिळत नसल्यानं एकनाथ खडसे अस्वस्थ झाल्यांच पाहायाला मिळत आहे. नांदुरा नगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलेला टोला यावर शिक्कामोर्तब करताना दिसत आहे.

नांदुरा नगर पालिकेच्या ५५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एकनाथ खडसे पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष नेत्यांवर निशाणा साधण्याची एकही संधी ते सोडत नसल्याचे दिसून येते.