मला त्रास देणारा ‘शनी’ ठाऊक आहे – एकनाथ खडसे

54
eknath-khadse

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्यापाठी शनीची साडेसाती लागली आहे असे सांगतानाच ‘शनी’ कोण आहे ते आपणास पक्के ठाऊक आहे, असे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले.

मधल्या काळात राजकारणात आपण जे काही अनुभवले, सोसले त्यानंतर राजकारण्याची आपल्याला अक्षरशः घृणा वाटायला लागली आहे, असे ते म्हणाले. सत्ताधाऱयांमध्ये दुःख केवळ आपल्याच वाटय़ाला आली, असे उद्वेगाचे उद्गारही खडसे यांनी यावेळी काढले. ज्या नेत्याने भाजपला वाढवण्यासाठी तब्बल 40 वर्षे कष्ट घेतले त्याच्यावर काडीचेही तथ्य नसलेले बिनबुडाचे आरोप करण्यात आले. मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. विधानसभेबाबतचा विचार ती निवडणूक जवळ आल्यावर करेन असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या